
शहापूर प्रतिनिधी दिपक विशे
शहापूर : पंडित नाका येथील महालक्ष्मी ज्वेलर्ससमोर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत दिनेशकुमार चौधरी या २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवाने मृत्यू झाल्याच्या घटनेविरोधात भारतीय जनता पक्ष, शहापूर शहराच्या वतीने शहापूर पोलिस स्टेशनला निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनाद्वारे पक्षाने या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, शहापूर शहरातील व्यावसायिक आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त वाढवावा, आणि भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे.
हे निवेदन भाजपचे शहापूर शहर अध्यक्ष श्री. विवेक नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
या प्रसंगी भाजप शहरचे संघटन सरचिटणीस श्री. विनोदसिंह ठाकूर, युवा मोर्चा अध्यक्ष श्री प्रियेश जगे ,नगरसेवक आनंद अधिकारी, नगरसेवक योगेश महाजन, शक्ती केंद्र प्रभारी मयूर भोपतराव, आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनाद्वारे या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून, शहापूरमधील व्यावसायिक समुदाय आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी भाजपने आपले समर्थन दर्शवले आहे.
शहापूर पोलिसांनी या मागण्यांवर त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा पक्षाने व्यक्त केली आहे.
या घटने मुळे शहापूर मधील व्यावसायिक समुदायात भीतीचे वातावरण पसरले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आले. तसेच सदर घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी .शहापूर शहरातील व्यावसायिक व नागरिकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात यावा.
शहापूर तालुक्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावा.
