स्वराज्य वार्ता

शहापूर प्रतिनिधी :- दिपक विशे

बेडीसगाव येथील नविन ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण आज भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश (बाल्यामामा) म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विशे यांच्या शुभहस्ते कऱण्यात आले. राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियन अंतर्गत सदर इमारत मंजुर झाली असून त्यास १८ लक्ष इमारतीस व २ लक्ष सोलर सिस्टीम असे एकूण २० लक्ष निधी सन २०२२ -२३ या वर्षी कामं मंजूर होत.

जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विशे यांच्या प्रयत्नाने सन २०१८- १९ या वर्षी बेडीसगावं येथे यापूर्वी जनसुविधा अंतर्गत नविन ग्रामपंचायत इमारती साठी निधि मंजूर झाला होता. परंतू जागे अभावी सदरील कामं हे परत गेले होते. नंतर पुन्हा प्रयत्न करून राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान मध्ये सदरील योजना मंजुर केली. व रविवार १० डिसेंबर २०२३ रोजी नविन ग्रामपंचायत कार्यालयाच उद्घाटन करण्यात आले होत. त्याच प्रशस्त इमारतीचं आज लोकार्पण भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश (बाल्यामामा) म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विशे यांच्या शुभहस्ते कऱण्यात आले. त्यावेळी प्रस्तावना मांडताना गावातील समस्यांचा पाढा रविंद्र खाडे यांनी वाचला ग्रामपंचायत कमिटी अस्तित्वात नसल्याने प्रशासकीय कारभार असल्याने १५ वित्त आयोगाचा निधी येत नसून गावामध्ये विकास कामांवर त्याचा परिणाम होत असल्याचं निदर्शनास आणून दिले. व बेडीसगावावर विशेष लक्ष देण्याची विनंती खासदार साहेबांना कऱण्यात आली.

यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख बाळू वरकुटे, नंदकुमार मोगरे, विकास गगे, बाळकृष्ण विशे, दिपक लकडे, शिवाजी दिनकर, ग्रामसेवक सचिन बूळे, विनायक सापळे, स्वप्निल भेरे, रविंद्र खाडे, लक्ष्मण भोईर, कालुराम बांगर, मुकेश विशे, पत्रकार दिलीप वरकुटे, दिनेश कांबळे, विठ्ठल धारवणे, नामदेव विशे, मालू विशे, काशिनाथ विशे, जनार्धन विशे, कांतीलाल विशे, रमेश हरड, ज्ञानेश्वर विशे, प्रशांत विशे, पोलीस पाटिल प्रगती विशे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महीला उपस्थित होते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!