जळगाव :- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दिनांक ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात आयोजित करण्यात आलेला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी दिली आहे.
तरी नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज केलेला असेल आणि सदरहू अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळालेले नसेल अशाच वैयक्तिक हितसंबधाबाबतच्या तक्रारी घेऊन या लोकशाही दिनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

सहकारी संस्थांशी संबंधीत लोकशाही दिन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सभागृहात ०२ फेब्रुवारी रोजी होणार
सहकारी संस्थाशी संबंधित होणारे सर्व लोकशाही दिन स्वतंत्ररीत्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगांव यांचे वतीने जिल्हा स्तरीय लोकशाही दिन दि. जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. जळगांव, प्रशिक्षण सभागृह, गणेश कॉलनी शाखा, जळगांव येथे ०२ फेब्रुवारी,२०२६, सोमवार रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात येणार आहे.
तसेच या पुढे होणारे सर्व सहकारी संस्थाशी संबंधित (स्वतंत्र) जिल्हास्तरीय लोकशाही दिन प्रत्येक महिण्याच्या पहिल्या सोमवारी, याच ठिकाणी आयोजित केले जातील याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, अशी माहिती सहाय्यक निबंधक धर्मराज पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
