जळगांव प्रतिनिधी :- जळगाव जिल्ह्यातील सर्व चर्मकार विकास संघातर्फे दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील रविवार दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता जगतगुरु संत शिरोमणी रविदास महाराज यांची ६४९ वी जयंती कार्यक्रम संत रोहिदास महाराज समाज मंदिर सभागृह, श्री.वानखेडे गुरुजी हाउसिंग सोसायटी, नेरी नाक्याजवळ, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी सकाळी ८ वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, रेल्वे स्टेशन जवळून समाज बांधवांची बाईक रॅली काढण्यात येऊन समारोप श्री.वानखेडे गुरुजी हाउसिंग सोसायटी मधील समाज मंदिर सभागृह येथे करण्यात येईल. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सकाळी ९ वाजता गुरु रविदास यांची प्रतिमा पूजन, त्यांच्या जीवन कार्यावर आधारित व्याख्यान, तसेच चर्मकार समाजातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार मान्यवर अधिकारी/ पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात येईल.

तरी या सामाजिक उपक्रमास चर्मकार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन चर्मकार विकास संघाचे प्रदेशअध्यक्ष श्री.संजयजी खामकर, उपाध्यक्ष श्री विश्वनाथ सावकारे, राज्य कार्यकारिणी सदस्य श्री संजय वानखेडे सर, प्रदेश सहसचिव ॲड.श्री.चेतन तायडे, ज्येष्ठ मार्गदर्शक श्री.वसंतराव नेटके, डॉ.संजय भटकर, ज्येष्ठ नागरिक आघाडी अध्यक्ष श्री.प्रकाश रोजतकर, अधिकारी संघटना अध्यक्ष श्री राजेंद्र बावस्कर, जिल्हाध्यक्ष डॉ.अर्जुन भारुळे, कार्याध्यक्ष श्री.राजेश वाडेकर सर, श्री.खंडू पवार, डॉ.श्री.कडू भोळे, श्री.मनोजभाऊ सोनवणे, सचिव प्रा.धनराज भारुळे, ज्येष्ठ सल्लागार श्री.उमाकांत भारुळे सर, श्री.केशव ठोसरे, श्री.कडू भोळे, श्री.काशीनाथ इंगळे, श्री.मुरलीधर भारुळे, श्री.विजय काकडे, श्री.मुकेश चव्हाण, इंगळे, श्री.बाळकृष्ण खिरोळे, श्री.गणेश काकडे सर, श्री.रतीराम सावकारे,

उपाध्यक्ष श्री.विजय पवार, श्री.गजानन दांडगे सर, महानगर अध्यक्ष श्री.कमलाकर ठोसर, श्री.शिवदास कळसकर, ॲड.श्री.मुकेश कुरिल, श्री.संदीप ठोसर सर, श्री.दीपक नेटके, श्री. ज्ञानेश्वर शेकोकार, श्री.रवी नेटके, महिला आघाडी पदाधिकारी सौ.ज्योतीताई निंभोरे, प्रा.सौ.स्मिता जयकर, सौ.उज्वला वाडेकर, सौ.सुनीता डांगे, सौ.उषा दांडगे, सौ.सुनीता वानखेडे, सौ.सुशीला तायडे, सौ.रेखा सोनवणे, सौ.योगिता वानखेडे, श्रीमती लता सावकारे श्री.कैलास वाघ सर, श्री.रिझायनर घुले, श्री.गोवर्धन चव्हाण, श्री.यशवंतराव ठोसरे श्री.दिलीप नेटके, श्री.साहेबराव ठोसर, श्री.शशिकांत भारुळे, श्री.अशोक शिंदे, श्री.नरोत्तम परमार, श्री.पंढरीनाथ सावकारे, श्री.सुनील तायडे, श्री.प्रकाश बाविस्कर श्री.इंद्रनील मोरे, श्री.अमृत सोनवणे, श्री.संतोष सावकारे, प्रा.संदीप शेकोकार, श्री.रवींद्र नेटके, श्री.अरुण नेटके, ज्ञानदेव भारुळे, श्री.लिलाधर भारुळे, श्री. ज्ञानेश्वर बाविस्कर, श्री.शांताराम घुले, श्री.बापू वानखेडे, श्री.मनोज सोलंकी, डॉ. के.डी.परमार, श्री.किशोर तायडे, श्री.रवींद्र भारुळे, श्री.अविनाश तायडे, श्री.उत्तम घुले, श्री.निलेश कळसकर, श्री.लिलाधर काकडे, श्री.दामोदर चव्हाण, श्री.कमलेश वाडिया, श्री.लोकेश भारुळे, आदींनी कळविले आहे.
