घनसांगवी प्रतिनिधी – श्रीराम गोपने.

मच्छिंद्रनाथ चिंचोली वाडी (ता. घनसावंगी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी माजी विद्यार्थी सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता.

या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. नारायण बुधनर, उपाध्यक्ष श्रीमती वंदना अशोक खटके, ग्रामपंचायत सदस्य श्री. वशिष्ठ वायसे, ग्रामपंचायतीच्या उपसरपंच श्रीमती अश्विनी गोफणे, डहाळेगावचे उपसरपंच श्री. नवनाथ तरंगे यांच्यासह शाळेचे माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी तार कंपाऊंड उभारण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. उपस्थित मान्यवर व माजी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री. श्रीराम बहिर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!