जळगांव :- चातक निसर्ग संवर्धन संस्था, वरणगाव व वन्यजीव विभाग, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पाचवे उत्तर महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना अंतर्गत तसेच उत्तर महाराष्ट्र संघटना संयोजित असून संपूर्ण महाराष्ट्रातील पक्षी निरीक्षक, पक्षी अभ्यासक व निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

सदर संमेलनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन पाल (ता. रावेर) येथील दादासाहेब चौधरी वन प्रशिक्षण संस्था या मनोहर परिसरात करण्यात आले आहे.

27 व 28 डिसेंबर – दोन दिवसीय भरगच्च कार्यक्रम

या दोन दिवसांच्या संमेलनात विविध उपक्रमांचे आकर्षक नियोजन करण्यात आले आहे, यामध्ये—

प्रख्यात पक्षी तज्ञांचे मार्गदर्शन, स्लाईड शो व सादरीकरण

पक्षीनिरीक्षणावरील चर्चासत्रे

पक्ष्यांचे आवाज ओळखण्याची स्पर्धा

स्थानिक संस्कृती अनुभवण्यासाठी आदिवासी नृत्य

रात्रीचे अवकाश निरीक्षण (Sky Watching)

दुसऱ्या दिवशी पहाटे जंगलात जंगल भ्रमंती व पक्षीनिरीक्षण

सहभागींसाठी खानदेशी रुचकर व पारंपरिक मेनू

संवर्धनावर सखोल चर्चा

सातपुडा परिसर व हातनुर धरण जलाशयातील पाणथळ पक्ष्यांचे संवर्धन, ‘पानथडीचे पक्षी आणि त्यापुढील समस्या’ या विषयांवर तज्ञ सखोल चर्चा करणार आहेत. स्थानिक जैवविविधतेच्या संरक्षेबाबत दिशा देणारे हे संमेलन ठरणार आहे.

या भव्य संमेलनाबाबत माहिती चातक निसर्ग संवर्धन संस्था अध्यक्ष व पक्षी अभ्यासक श्री. अनिल महाजन यांनी दिली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील निसर्गप्रेमी व पक्षीप्रेमींना या संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 

अनिल महाजन पक्षी अभ्यासक

चातक निसर्ग संवर्धन संस्था वरणगाव भुसावळ

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!