जळगांव :- दिनांक 05 डिसेंबर 2025 रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना जळगाव व गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना व एम्पलोयी एनरोलमेंट कॅम्पेन 2025 या विषयावरील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून नाशिक रीजनचे रिजनल कमिशनर श्री अनिल कुमार प्रीतम सर हे उपस्थित होते.

व्यासपीठावर जळगाव जिल्ह्याचे भविष्य निर्वाह निधी संघटनेचे असिस्टंट कमिशनर श्री के के कुंभार इन्स्पेक्टर श्री दीपक चौधरी तसेच परिसंस्थेचे संचालक डॉ प्रशांत वारके हे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना श्री अनिल कुमार प्रीतम यांनी या योजनेअंतर्गत, पहिल्यांदाच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे वेतन (15,000/- रुपयांपर्यंत) मिळेल, तर नियोक्त्यांना अतिरिक्त रोजगार निर्मितीसाठी दोन वर्षांपर्यंत प्रोत्साहन दिले जाईल, तसेच उत्पादन क्षेत्रासाठी आणखी दोन वर्षांसाठी वाढीव लाभ दिले जातील. 4.1 कोटी तरुणांना रोजगार, कौशल्य आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधानांच्या पाच योजनांच्या पॅकेजचा भाग म्हणून 2024-25 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात इएलआय योजना जाहीर करण्यात आली होती, जिचा एकूण अर्थसंकल्पीय खर्च 2 लाख कोटी रुपये आहे. 99,446 कोटी रुपये खर्चाच्या इएलआय योजनेचे उद्दिष्ट 2 वर्षांच्या कालावधीत देशात 3.5 कोटींहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे असे आहे. यापैकी 1.92 कोटी लाभार्थी पहिल्यांदाच कामगार क्षेत्रात प्रवेश करतील. या योजनेचे फायदे 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 दरम्यान निर्माण झालेल्या नोकऱ्यांना लागू होतील.

या योजनेचे दोन भाग आहेत. भाग अ पहिल्यांदाच काम करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करतो तर भाग ब नियोक्त्यांवर लक्ष केंद्रित करतो:

भाग अ: पहिल्यांदाच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर वेतन:

ईपीएफओमध्ये नोंदणी असलेल्या पहिल्यांदाच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दखल घेत , या भागात 15,000 रुपयांपर्यंतचे एक महिन्याचे ईपीएफ वेतन दोन हप्त्यांमध्ये दिले जाईल. 1 लाख रुपयांपर्यंत पगार असलेले कर्मचारी यासाठी पात्र असतील.

पहिला हप्ता 6 महिन्यांच्या सेवेनंतर तर दुसरा हप्ता 12 महिन्यांच्या सेवेनंतर आणि कर्मचाऱ्याने आर्थिक साक्षरता कार्यक्रम पूर्ण केल्यानंतरच देय असेल. बचतीची सवय लावण्यासाठी प्रोत्साहनपर वेतनाचा एक भाग एका निश्चित कालावधीसाठी ठेव खात्याच्या बचत साधनात ठेवला जाईल आणि नंतरच्या तारखेला कर्मचारी ही रक्कम काढू शकेल.

भाग अ चा फायदा पहिल्यांदाच काम करणाऱ्या सुमारे 1.92 कोटी कर्मचाऱ्यांना होईल.

भाग ब: नियोक्त्यांना पाठिंबा:

या भागात उत्पादन क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करून सर्व क्षेत्रांमध्ये अतिरिक्त रोजगार निर्मितीचा समावेश असेल. 1 लाख रुपयांपर्यंत पगार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी नियोक्त्यांना प्रोत्साहन रक्कम मिळेल. किमान सहा महिने सलग नोकरी करणाऱ्या प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यापोटी सरकार नियोक्त्यांना दोन वर्षांसाठी दरमहा 3000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन रक्कम देईल. उत्पादन क्षेत्रासाठी, प्रोत्साहनपर रक्कम तिसऱ्या आणि चौथ्या वर्षासाठी देखील विस्तारित केली जाईल.

ईपीएफओकडे नोंदणीकृत असलेल्या आस्थापनांना किमान दोन अतिरिक्त कर्मचारी (50 पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या नियोक्त्यांसाठी) किंवा पाच अतिरिक्त कर्मचारी (50 किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या नियोक्त्यांसाठी) किमान सहा महिन्यांसाठी सलगपणे नियुक्त करावे लागतील. अशी महत्त्वपूर्ण माहिती अनिल कुमार प्रीतम यांनी दिली

सदर कार्यक्रमास जळगाव जिल्ह्यातील सुमारे 120 उद्योग क्षेत्रातील उद्योजक व अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु भूमिका नाले यांनी केले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!