आ. राजुमामा भोळे यांनी भ्रमणध्वनीवर दिले आश्वासन…

मेहरूण स्मशानभूमीतील सुविधांसाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप मांडोळे आणि गणेश पाटील यांनी जिवंतपणे चितेवर बसुन स्थानिक रहिवासी यांच्यासह केलेल्या अनोख्या आंदोलनाची दखल जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे यांनी घेतली दखल
मेहरूण स्मशानभूमीत इलेक्ट्रीक शवदाहिनी बसविणे, सभा मंडप, सुरक्षा रक्षक वगैरे सुविधा पुरविणेची कार्यवाही न झालेमुळे महानगरपालीकेकडे वारंवार मागणी करूनही मागण्या पुर्ण होत नसुन मेहरूण परीसरातील स्मशानभूमी मध्ये नागरीकांना असुविधांचा त्रास होत आहे.
त्यानुसार मा. आयुक्त यांनी कामे हाती घेण्यात आलेली असल्याने सदरचे आंदोलन करू नये, असे कळविलेले होते व त्यानुसार आम्ही महानगरपालीकेस सहकार्य केलेले होते. परंतु महानगरपालीकेस कळवुन आजपावेतो २०० दिवस होऊनही कोणतीही कार्यवाही न झालेने दि. ०५/१२/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता १) गणेश पाटील, २) संदीप मांडोळे व इतर यांचेतर्फे मेहरूण स्मशानभूमीमध्ये चितेवर / सरणावर जिवंतपणे बसुन मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन केले व ही बाब मा. आ. राजुमामा भोळे यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी स्वतः भ्रमणध्वनीद्वारे मागण्यांची पुर्तता करण्याचे आश्वासन दिल्यानंतर चितेवर जिवंतपणे बसुन मागण्या पुर्ण करण्याचे आंदोलन आज आम्ही मागे घेतलेले आहे.

लोकहीतास्तव मागण्या :-
१) मेहरूण स्मशानभूमीत इलेक्ट्रीक शववाहीनी बसविणे.
२) मेहरूण स्मशानभूमीत सभामंडपाचे बांधकाम, अस्थी लॉकर करून मिळावे.
३) मेहरूण स्मशानभूमीत सुरक्षा रक्षकाची नेमणूक करणे, सध्या अस्तित्वातील ओटा स्थलांतरीत करणे व जवळ राहणाऱ्या नागरीकांचे प्रदुषणापासून संरक्षण करावे.
४) महानगरपालीका अधिनस्त बांधकाम विभागाकडून वरील कामात होत असलेल्या दिरंगाईबाबत स्वतंत्र चौकशी करून त्यांचेवर कर्तव्यात कसुर केले प्रकरणी कायदेशिर कारवाई करावी.
चितेवर बसुन आंदोलन करते वेळी संदीप मांडोळे, गणेश पाटील यांचे सोबत संजय जगताप, अरूण मालपाणी, डी. आर. पाटील, संजय सपकाळे, अतुल महाजन, हर्षल वाणी, महेश माळी, विशाल गुजर, भुषण सोनवणे, गणेश सोनवणे, निलेश घुगे पाटील वगैरे तसेच मेहरूण परीसरातील बहुसंख्य महिला व नागरीक या आंदोलनात सहभागी झाले होते.
