
जळगाव प्रतिनिधी. राजकिय व सामाजिक संवाद सोहळ्यात वंचित बहुजन आघाडी प्रणीत एकलव्य आघाडी मध्ये कानळदा भोकर गटातील शेकडो पदाधिकारी यांचा प्रवेश सोहळा आयोजक सामाजिक कार्यकर्ते गोरख गायकवाड आणि सुजाताताई गायकवाड यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता.

राजकिय व सामाजिक संवाद सोहळा वंचित बहुजन आघाडी आयोजित कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती, प्रदेश अध्यक्ष अनिल जाधव साहेब, प्रदेश प्रवक्ते अमित भाऊ तडवी, आदिवासी सामाजिक कार्यकर्ता सिताराम भाऊ सोनवणे सिलोड, सुलतान भाऊ तडवी राहुल भाऊ ठाकरे, मा. ग्रा पं सदस्य खेडी खुर्द हिम्मत आण्णा सोनवणे, माजी सरपंच खेडी खुर्द अशोक दादा मोरे, रमेश दादा घारे, किरण भाऊ सोनवणे, बापू भाऊ मोरे, यांची होती.
तसेच कार्यक्रमात दिपक भाऊ नन्नवरे, अक्षय भाऊ सोनवणे, चेतन सपकाळे, चरण शहा, धनराज सोनवणे, निखिल सपकाळे, विशाल सोनवणे, विशाल सोनवणे, शुभम तायडे, प्रेमराज निकम, दिपक सोनवणे, गोलू सोनवणे, राहुल तायडे, यां सर्व तरुण मित्र परिवाराचे अनमोल असे सहकार्य लाभले त्यासाठी आयोजकांनी त्यांचे देखील या प्रसंगी आभार व्यक्त केले.
तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला, कार्यक्रमात उपस्थित बळिराम भाऊ भिल्ल, अविनाश जाधव, भगवान मोरे, यशवंत गायकवाड, संजय मोरे, छगन गायकवाड, लक्ष्मण मालचे, गणेश सोनवणे, आश्विन मोरे, रोहित गायकवाड, पिटा बाई मिराबाई सोनवणे, गायकवाड, सुनंदा बाई मोरे, जोता बाई मोरे, अनिता बाई सोनवणे, मिना बाई आयरे, सुनंदा बाई सोनवणे, शांताबाई जाधव तसेच कानळदा भोकर गटातील सर्व समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्याबद्दल सर्वांचे आभार सामाजिक कार्यकर्ते तसेच या सोहळ्याचे आयोजक गोरख गायकवाड आणि सुजाताताई गायकवाड यांनी व्यक्त केले.
