जळगांव प्रतिनिधी. जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघातर्फे जगतगुरु संत रविदास महाराज यांची पुण्यतिथी जिल्हाध्यक्ष ॲड. श्री. अर्जुन भारुळे यांच्या कार्यालयात चर्मकार समाज बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस गुरु रविदास यांच्या मूर्तीस चर्मकार विकास संघाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. विश्वनाथ सावकारे, राज्य कार्यकारिणी सदस्य श्री संजय वानखेडे सर, जिल्हाध्यक्ष ॲड श्री.अर्जुन भारुळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले, तसेच उपस्थित सर्वांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी सामाजिक क्रांतीचे तथा समतेचे प्रणेते संत रविदास महाराज यांच्या जीवन कार्याची माहिती उपस्थितांनी सांगितली.

या प्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक श्री.काशीनाथ इंगळे,श्री.बाळकृष्ण खिरोळे, श्री.उमाकांत भारुळे सर, श्री.संदीप ठोसर सर, श्री.पवन भारुळे, महानगर अध्यक्ष सौ.सुनीता वानखेडे, उपाध्यक्षा सौ.उषा दांडगे, श्री.पंकज भारुळे, श्री.मुकेश वाडिया आदी समाजबांधव उपस्थित होते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!