जळगांव :- जळगाव येथील नेरी नाक्याजवळील श्री. वानखेडे गुरुजी हाउसिंग सोसायटीतर्फे रविवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता संस्थेचे सचिव श्री. गोवर्धन चव्हाण यांच्या हस्ते शाल देऊन व अध्यक्ष श्री. वसंतराव नेटके यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. श्री. राजेंद्र सोनवणे यांचे निस्वार्थ, नियमित स्वच्छतेच्या कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी म.न.पा.चे सेवानिवृत्त उपायुक्त श्री.वसंतराव सुरवाडे, श्री.संजय वानखेडे सर, श्री.नरोत्तम परमार, सौ.उषा नेटके यांच्या हस्ते औक्षण करण्यात आले.

याप्रसंगी उपस्तितांनी समस्त आरोग्य विभागाचे कर्मचारी यांचे आभार मानले, तसेच स्वच्छ भारत योजने अंतर्गत कार्यरत असलेले घंटागाडी सेवक तसेच सर्वच सफाई कर्मचारी हे नेहमीच समाजाच्या आरोग्याची सेवा करत असतात, त्यात ही घंटागाडी सेवक राजेंद्र सोनवणे हे अविरत सेवा बजावत असतात, अश्याच पद्धतीने सर्वांनी आदर्श घेऊन कार्य करावे ही अपेक्षा व्यक्त केली.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!