मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.

आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलखेड ता.परतुर, जि. जालना. येथे गेल्या सात वर्षांपासून कार्यरत राहीलेले शिक्षक श्री.पाईकराव सर व श्रीमती तनपुरे मॅडम यांना निरोप देण्यात आला.

आपली सेवा म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाची बीजे पेरणारा एक अनमोल काळ होता. आपल्या प्रेमळ स्वभावाने, कष्टाळू वृत्तीने आणि मार्गदर्शनाने शाळेला नवे रूप दिले तसेच, विद्यार्थ्यांना शिकण्यासोबतच चांगले संस्कार दिले.
परंतु प्रशासनाच्या नियमानुसार आपली बदली झाली तरी आपणास पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा तसेच नव्याने रुजू झालेले शिक्षक श्री.राजबिंडे सर व श्री.केवारे सर यांचे स्वागत करण्यात आले आपणही शाळेचा दर्जा टीकवुन ठेऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे लक्ष द्याल अशी अपेक्षा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.लक्ष्मण बिल्हारे यांनी व्यक्त केली.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.खवल सर, श्री.ईरले सर, श्री.वावरे सर, श्रीमती.रुद्रे मॅडम तसेच शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री.लक्ष्मण बिल्हारे, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री.सुनिल सुरुंग, श्री.दत्ताभाऊ अंभुरे (जिल्हाध्यक्ष वैद्यकीय सहायता कक्ष), श्री.प्रभाकर सुरुंग, श्री.तुळशीदास बिल्हारे, श्री.बाळासाहेब डेव्हारे, श्री.परमेश्वर बिल्हारे, श्री.तुकाराम डव्हारे, श्री.नारायण मिंड, श्री.संतोष पाईकराव, श्री.शिद्धोधन पाईकराव, श्री.सुदाम राजकवर, श्री.सतिष बिल्हारे, श्री.सुनिल बिल्हारे आदि पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!