मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.

जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषदे मार्फत 2024 ते 2025 या कालावधीमध्ये जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये सी.सी.टीव्हीचा कॅमेरेत मोठा भ्रष्टाचार

जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषदे मार्फत जिल्हा परिषद शाळेमध्ये 2024 ते 2025 या कालावधीमध्ये जिल्हा परिषद शाळेत सी.सी.टीव्ही बसवण्याकरिता टेंडर काढून 2 कोटी 99 लाख 46 हजार टेंडर श्री स्वामी समर्थ मल्टी सर्विसेस यांना देण्यात आले, परंतु त्या संस्थेच्या मार्फत जिल्हा परिषद शाळेमध्ये सी.सी.टीव्ही व ईतर साहित्य निकृष्ट दर्जाचे या संस्थेने साहित्य दिले आहे. इस्टिमेट प्रमाणे या संस्थेने काम केलेले नाही व बऱ्याच शाळेवर ज्या ठिकाणी आठ कॅमेरे बसायचे त्या ठिकाणी पाच बसवण्यात आले व त्यासोबत साहित्य सुद्धा पूर्ण दिले नाही.

यामध्ये शिक्षणाधिकारी यांना हाताशी धरून या संस्थेने सर्व जिल्ह्यामधील जिल्हा परिषद शाळेमधील बसवलेले सी.सी.टीव्ही मध्ये अशाप्रकारे सावळा गोंधळ केलेला आहे.

तरी याची योग्य ती चौकशी करून श्री स्वामी समर्थ मल्टी सर्विसेस परभणी या संस्थेवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य अंकुशराव बोबडे यांनी निवेदनाद्वारे केली.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!