शहापूर प्रतिनिधी, दिपक विशे.

दि.22 ऑगस्ट 2025 रोजी तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन शहापूर येथे करण्यात आले. सदर महोत्सवाचे उद्घाटन मा. गटविकास अधिकारी पं.स.शहापूर श्री राठोड साहेब तसेच मा.तालुका कृषी अधिकारी शहापूर श्री कुमार जाधव साहेब, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री विलास झुंजारराव साहेब, कृषी उद्यान पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री बबनजी हरणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर महोत्सवात शेतकरी उत्पादक गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी सखी महिला आर्थिक विकास महामंडळाचे गट, तसेच तालुक्यातील आदिवासी शेतकरी बांधवांनी उपलब्ध विविध रान भाज्यांचे स्टॉल मांडून सहभाग नोंदवला.

सदर कार्यक्रमात उत्कृष्ट पाक कला तसेच सहभागी शेतकरी गट यांना प्रोत्साहन पर प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमास तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी उप कृषी अधिकारी यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे नियोजन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री जितेश खांडगे व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री विनोद कदम यांनी केले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!