जळगांव प्रतिनिधी
मागिल काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ता गोरख गायकवाड यांनी वडनगरी ग्रामपंचायत येथिल उपसरपंच यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे निवडून शासनाची व ग्रामस्थांची फसवणूक केली होती त्या अनुषंगाने गायकवाड यांनी मा. जिल्हाधिकारी व मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात तक्रार दाखल केली होती तरी मा. न्यायालयाने गायकवाड यांच्या बाजूने निकाल देऊन उपसरपंच यांना अपात्र घोषित केले होते तसेच चार महिन्यापासून रिक्त असलेल्या उपसरपंच पदावर दि. 21 ऑगस्ट रोजी सौ. उषाबाई नवल पाटील यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ता गोरख गायकवाड यांनी त्यांना उपसरपंच म्हणून निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या व आपल्या कडून गावांचा विकास कामे व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. यावेळी पोलिस पाटील, जितेंद्र पाटील, ग्रामसेवक भूपेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य, गोरख चौधरी , तसेच गावातील प्रमोद सोनवणे, धनराज पाटील, रोहित पाटील, चेतन सोनवणे, अजय सोनवणे, किशोर मोरे, रोहन सोनवणे, गणेश सोनवणे, सचिन चौधरी व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
