जळगाव शहर प्रतिनिधी.

कांचन नगर परिसरातील नागरिकांच्या वतीने सत्कार सोहळा, नागरिकाच्या मतानुसार आपणच भावी नगरसेवक, नगरसेविका

दि,११/०६/२५, रोजी प्रभाग क्रं (२) कांचन नगर मधील रहिवाश्यांना दिलेल्या रस्ते, पथ दिवे, गटार तसेच परिसरातील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी मध्ये सहकार्य करणार असे विविध आश्वासनांची पूर्तता केल्या बद्दल जेष्ठ, नागरिकांच्या व महिला भगिनी यांच्या हस्ते ( गुण गौरव सत्कार) करण्यात आला. या प्रसंगी स्थानिक नागरिकांच्या मतानुसार श्री. किशोर बाविस्कर आणि सौ. उज्वला बाविस्कर हे दोघे ही भावी नगरसेवक आणि नगरसेविका म्हणून आमच्या प्रभागातून दिसणार, त्याचे कारण असे की मनपा क्षेत्रात ज्यावेळेपासून प्रशासक नियुक्त झाले तेव्हा पासून जळगाव शहराचा विकास हा जवळ जवळ थांबून आहे, मात्र त्याच वेळी श्री. किशोर बाविस्कर आणि उज्वला बाविस्कर यांनी मात्र आपले कार्य सातत्याने पाठपुरावा करून पूर्ण करून घेतले, तसेच आम्हा स्थानिक नागरिकांना वेळोवेळी विविध कार्यामध्ये नेहमीच सहकार्याची भूमिका दोघांची ही असते. असे विविध गुणगौरव उद्गार यावेळी नागरिक करत होते.

या सत्कार समारंभाच्या वेळी श्री. किशोर बाविस्कर आणि सौ. उज्वला बाविस्कर यांनी आपले मनोगत व्यक्त केले की, येणाऱ्या काळात देखील याप्रकारे या प्रभागाचा कामांच्या माध्यमातून कायापालट करण्याचा आमचा मानस राहील. आम्ही जनहित सर्वोपरी असा ध्यास उराशी बाळगून प्रामाणिक पने जनसेवा करण्यावर अधिक भर देत आलो आहे आणि भविष्यात ही देत राहणार, असे सत्कार सोहळा प्रसंगी आश्वासन दिले व सर्वांचे आभार मानले.
