कोल्हापूर प्रतिनिधी – प्रदीप जाधव.

कोल्हापूर दिनांक 11 जून 2025 डॉ. वनिता बापू शिंदे यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे देण्यात आलेल्या संत रविदास पुरस्काराचे वितरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र जी फडणवीस व उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री मा. संजय शिरसाट साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे संपन्न झाला. पुरस्काराचे स्वरूप रुपये 51 हजार रकमेचा धनादेश, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री मा. संजय शिरसाट साहेब, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार माधुरी मिसाळ, सामाजिक न्याय विभागाचे सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, समाज कल्याण विभाग कोल्हापूर चे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!