मराठवाडा विभागीय प्रतिनिधी – अनिरुद्ध साबळे.
शेतकरी असाल तर जालन्यात दिसाल.
चलो जालना चलो चलो जालना. अश्या ब्रिद वाक्याचे बॅनर आज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काल पोलिस प्रशासनातील साबळे यांनी एका शेतकऱ्याला एका आरोपीला देखील देत नाही अशी वागणूक दिली, या शेतकरी विरोधी साबळे यांच्या वर प्रशासनाकडून कठोर कारवाई करावी या मागणी साठी उद्या जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी धडक मोर्चा घेऊन जाणार आहेत.
सोशल मीडियावर वरील पोस्ट मधून सर्व शेतकऱ्यांना केलेलं आवाहन
उद्या प्रतेक गावातून कमीत कमी पाच शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जाण्यासाठी यावे.
आपण या काल झालेल्या अन्यायाविरोधात जर बाहेर पडणार नसू तर उद्या शेतकऱ्यांची लढाई लढण्यासाठी कोणीही समोर येणार नाही.
मी एक शेतकरी पुत्र म्हणून काल पोलीस प्रशासनाने जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या एका शेतकरी पुत्रावर केलेल्या धक्काबुक्की विरुद्ध गुंडागर्दी विरुद्ध त्या पोलीस कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यासाठी मी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर येत आहे, तुम्ही ही शेतकरी पुत्र म्हणून यावे ही विनंती.
शेतकरी विरोधी सरकारचा व मग्रुर शेतकरी विरोधी पोलिस प्रशासनाचा जाहीर निषेध
