मराठवाडा विभागीय प्रतिनिधी – अनिरुद्ध साबळे
जालना : ब्रेकिंग
जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील घटना

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर घडला प्रकार

पालकमंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन द्यायला आलेले शेतकरी गजानन उगले यांना पोलिसांची धक्का बुक्की, तालुका पोलिसांना शेतकरी दहशतवादी वाटतात का? एवढी मुजोरी बरोबर आहे का? धक्का बुक्की करणाऱ्या तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांवर वरिष्ठांनी कारवाई करण्याची मागणी शेतकरी करत आहे…

जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशा मागणीचं निवेदन पालकमंत्री पंकजा मुंडेंना देण्यासाठी आलेल्या शेतकरी आंदोलकाला पोलिस अधिकारी साबळे यांनी ढकलून देऊन जमिनीवर पाडलं आहे. जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालय समोर ही घटना घडलीय. पालकमंत्री पंकजा मुंडे यांची जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर पंकजा मुंडे अमरावतीकडे निघालेल्या असताना ही घटना घडली. दरम्यान या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. गजानन उगले असं या शेतकऱ्याचं नाव आहे उगले हे शेतकरी प्रश्नांबाबत सतत आंदोलन करत असतात.
