२४२ प्रवाशांमध्ये केवळ एकच वाचला…कसा वाचला ?… सीट ११A’ बनली जीवनरक्षक…

आज गुरुवारी गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक भीषण विमान अपघात घडला. एअर इंडियाचे विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच कोसळले. हा अपघात इतका भयानक होता की सुरुवातीला यात कोणाचाही जीव वाचला नसेल, या अपघात आता पण आलेल्या माहितीनुसार २४१ जणांचा मृत्यू झाला असल्यास माहिती समोर येत आहे. मात्र काही तासांनी एक अशी बातमी समोर आली, जिने सर्वांनाचआश्चर्यचकित केलं – एका प्रवाशाचा जीव वाचला!

मिळालेल्या माहितीनुसार, वाचलेला प्रवासी ब्रिटिश नागरिक रमेश विश्वास कुमार (वय ४०) असून तो सीट नंबर ११A वर बसला होता. ही सीट बिझनेस क्लास नंतर सुरुवात होणाऱ्या इकॉनॉमी क्लासमधील पहिल्या रांगेतील होती आणि एक्झिट रांगेजवळ होती. तज्ञांच्या मते, सीटची रचना आणि स्थान हे या चमत्कारीक बचावामागे कारणीभूत ठरले असू शकते.

अपघाताच्या ठिकाणी आढळला जिवंत प्रवासी

अहमदाबादचे पोलिस आयुक्त जीएस मलिक यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, “सीट ११ वरून एक व्यक्ती जिवंत सापडला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या मृतांची नेमकी संख्या सांगता येत नाही, कारण विमान एका निवासी भागात कोसळले आहे.” रमेश कुमारची ओळख व बोर्डिंग पास व्हायरल रमेश कुमारचा बोर्डिंग पासही समोर आला असून त्यावर स्पष्टपणे सीट नंबर ११A लिहिलेला आहे. अपघातानंतर एका व्यक्तीचा जीव वाचणे हे केवळ चमत्कारच म्हणता येईल. सध्या त्याची प्रकृती गंभीर असली तरी तो उपचारांना प्रतिसाद देत आहे.

इतर प्रवासी जिवंत असण्याची शक्यता अहमदाबादचे पोलिस आयुक्त जीएस मलिक यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, “सीट ११A वरून एक व्यक्ती जिवंत सापडला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या मृतांची नेमकी संख्या सांगता येत नाही, मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2001 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. विमान एका निवासी भागात कोसळले त्या भागातील कुठले रहिवासी जखमी किंवा मयत झाले आहेत अशी माहिती मिळाली नाही.

भारतीय विमान वाहतुकीच्या इतिहासात आज काळा दिवस म्हणून नोंदवला गेला आहे. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. हा अपघात झाला, त्यावेळी विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर होते.

● हा अपघात इतका भयानक होता की त्यामध्ये सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. अहमदाबादच्या पोलीस संचालकांनी देखील ही भीती व्यक्त केली होती. पण, त्याचवेळी चमत्कार घडला आहे. या अपघातामध्ये काही प्रवासी बचावले आहेत.

• रमेश विश्वास कुमार असे या अपघातामध्ये वाचलेल्या एका प्रवाशाचे नाव आहे. ते या विमानात 11 A या सीटवर बसले होते. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा अनुभव त्यांना आला आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!