अहमदाबाद | एअर इंडियाच्या अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानाच आज दुपारी मेघानीनगर परिसरातभीषण अपघात झाला. उड्डाणानंतर काही मिनिटांतच हे विमान उड्डाणानंतर काही वेळातच यंत्रणेत तांत्रिक बिघाड होऊन कोसळल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे, त्यानंतर त्याला प्रचंड आग लागली. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमान कोसळल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या विमानात १० क्रू मेंबरसह एकूण २४२ प्रवासी होते. विमानानं अहमदाबाद विमानतळावरुन उड्डाण घेतल्याच्या काहीच मिनिटांत मेघानीनगर रहिवासी परिसरात ते खाली कोसळल्यानंतर विमानाला आग लागून त्यातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे, याच विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी हे देखील प्रवास करत होते, असे गुजरामधील पोलीस आयुक्तांशी संवाद साधल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

या विमानात १२ क्रू मेंबर्स आणि २३० प्रवासी प्रवास करत होते. क्रू मेंबर्समध्ये मुंबईकर अपर्णा महाडिक या सुद्धा होत्या. अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरेंचे भाचे अमोल यांच्या पत्नी होत..
एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानातील एकूण २४२ प्रवाशांमध्ये, १६९ भारतीय प्रवासी, ५३ ब्रिटीश नागरिक, पोर्तुगालचे ७ आणि कॅनडाचा १ नागरिक प्रवास करत होते, अशी माहिती समोर आली आहे. दुर्दैवाने सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
