कारंजा प्रतिनिधी:

वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील तालुका आरोग्य अधिकारी शंकर नांदे यांचे निलंबन व अन्य मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते विनोद नंदागवळी रा. भुलोडा यांनी १४ मे पासून स्थानिक तहसील कार्यालय समोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे, या उपोषणाचा आज ६ वा दिवस असून, अद्यापही प्रशासनाने उपोषणकर्ते विनोद नंदागवळी यांची दखल घेतलेली नाही, या वरून जन सामन्यात प्रश्न निर्माण झालेला आहे की, हेतू पुरस्कर तर तालुका आरोग्य अधिकारी यांना पाठीशी घातले तर जात नाही ना? आणि जर नाही तर मग का म्हणून निःपक्ष चौकशी करून या प्रकरणाचा चौकशी अहवाल सार्वजनिक करण्यात येत नाही.

तसेच उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते विनोद नंदागवळी यांना धमकी देऊन धक्का बुक्की करण्याचा प्रयत्न या आधी देखील झालेला होता, आता उपोषण ठिकाणी पोलिस प्रशासनाने देखील सुरक्षा दिलेली नाही, उपोषणकर्ते यांच्या सोबत काही अनिष्ट घडून गेल्यावर प्रशासन सुरक्षा देणार का?

वरील सर्व विषयावरून एकंदरीत सर्वच प्रशासन हे प्रकरण दडपून टाकण्याच्या प्रयत्नात आहे, असे दिसून येत आहे. एक प्रकारे लोकशाहीची गळचेपी करण्याचा आणि कायदा पायदळी तुडविण्याचा मानस काही सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी संगनमताने केलेला आहे, अशी जोरदार चर्चा जन माणसात रंगताना दिसून येत आहे, यामध्ये एक मात्र नक्की की, या प्रकरणामुळे नाहक संपूर्ण आरोग्य विभागाची आणि पोलिस प्रशासनाची प्रतिमा जनमानसात खराब होत आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नांदे यांनी पदाचा दुरुपयोग केल्याने त्यांना निलंबित करावे, येथील ए. सी. वाइन शॉपीचा परवाना रद्द करावा या व इतर मागण्यासाठी विनोद नंदागवळी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!