कोल्हापूर प्रतिनिधी, प्रदीप जाधव.

खोची येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी सुमारे दोन हजार लोकांची उपस्थिती होती. छत्रपती संभाजी महाराजांचा जीवन प्रवास शौर्यगाथा आणि पराक्रम जन्मापासून ते बलिदानापर्यंत इतिहास ऐकताना अंगावर रोमांच उभे राहिले होते. महाराजांच्या जीवन प्रवासातील उत्तरार्धातील संदर्भ देत असताना श्रोतावर्ग भावूक झाला होता.

याचबरोबर खोची गावातील स्पर्धा परीक्षा आणि इतर विभागातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चाळीस सुपुत्रांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला. याचबरोबर गावातील स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचाही मुलांना वाचण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीकडून स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या पुस्तक भेट म्हणून देण्यात आली.

प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांनी खोची गावचे आराध्य दैवत श्री भैरवनाथाचे दर्शन घेऊन आपल्या व्याख्यानाला सुरुवात केली. यावेळी प्रमुख उपस्थिती प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील, sp9 न्यूज चैनल चे संस्थापक अध्यक्ष सागर पाटील. व्ही ए बाबर सर.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित पंचक्रोशीतील श्रोतावर्ग, ग्रामस्थ, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, देणगीदार, शिक्षक, तरुण-तरुणी, महिला वर्ग मोठ्या प्रमाणात होता.
प्रस्तावना कुमार बाबर, आभार डी .एस. पाटील सर यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन महादेव पाटील, रोहित डवरी, राज पाटील, सुशांत पाटील, अनिकेत पाटील, सुरज पाटील, रणजीत पाटील, शैलेश पाटील, आणि खोची गावात तरुण वर्ग आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती खोची यांनी केले.
