अहिल्यानगर प्रतिनिधी, शंकर कवाने.
नाणिजधामचे मठाधिपती जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी केलेल्या मरणोत्तर देहदानाच्या आवाहनास प्रतिसाद मिळत असून राहुरी शहरातील डॉ.सचिन शिवाजी तनपुरे यांनी मरणोत्तर देहदान व नेत्रदान केले आहे.नाणिजधामचे हे राज्यातील १०४ वे तर जिल्ह्यातील ६ वे देहहान होते.
जगद्गुरू स्वामी नरेंद्रचार्य यांनी स्व स्वरुप संप्रदायातील भक्त परिवारास मृत्यूनंतर देहदान व नेत्र दान करून समाजाच्या उपयोगी पडण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनास मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेक भक्तांनी मरणोत्तर देहदान फॉर्म संस्थांनकडे सुपूर्त केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून १०४ जणांनी देहदान केले आहे.

राहुरी येथील मल्हारवाडी रोड येथील रहिवासी डॉ.सचिन शिवाजी तनपुरे(वय-५२) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे देह व नेत्रदान जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान मार्फत विळदघाट येथील विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रकिया पार पडली.
देहदानाबद्दल उपक्रमाबद्दल माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी माजी नगराध्यक्षा डॉ.उषाताई तनपुरे, युवा नेते हर्ष तनपुरे, सीताराम काकडे, ताराचंद तनपुरे, रावसाहेब राधुजी तनपुरे, भिकुशेठ भुजाडी, राऊ तनपुरे, नंदकुमार तनपुरे, सागर तनपुरे, नितीन देशमुख, आदिंसह यावेळी सविता तनपुरे, राहुल तनपुरे, स्मिता तनपुरे, स्वराली तनपुरे, स्वराज राहुल तनपुरे, अश्विनी गावडे धीरज गावडे, दिया गावडे, राधिका गावडे तसेच स्व स्वरुप संप्रदायाचे उत्तर महाराष्ट्र पिठ देणगी प्रमुख सोमेश्वर घोगरे, उत्तर जिल्हाध्यक्ष सयाजी भडांगे, उत्तर निरीक्षक दादासाहेब मते, युवा जिल्हा प्रमुख गोकुळ वैष्णव, जिल्हा तंत्रज्ञान प्रमुख स्वप्नील गायकवाड, जिल्हा रुग्णवाहिका प्रमुख विजय प्रधान, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ येवले, राहुरी तालुकाध्यक्ष दत्तात्रय म्हसे, महिला तालुका अध्यक्ष दमयंती गडधे, नगर तालुकाध्यक्ष अप्पासाहेब भोंबले दक्षिण नगर जिल्हा अध्यात्मिक प्रमुख गणेश नवसुपे, शिवनाथ लवहरकर प्रभाकर उंडे, चंद्रकांत जगताप, भाऊसाहेब गुलदगड, अमोल क्षीरसागर आदी उपस्थित होते.
