मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त झालेले आयपीएस अधिकारी श्री. देवेन भारती यांची आज आमदार हिकमत दादा उढाण आणि अजित भैय्या उढाण यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी देवेन भारती यांचे नवीन पदाबद्दल अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

देवेन भारती यांनी १९९८ ते २००० या कालावधीत जालना येथे पोलीस अधीक्षक (SP) म्हणून काम केले होते. या भेटीदरम्यान जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि त्यांनी त्या काळातील अनुभवांवर चर्चा केली. हिकमत दादा उढाण आणि अजित भैय्या उढाण यांनी भारती यांच्या कर्तृत्वाचे कौतुक करत त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी पाठिंबा व्यक्त केला.
देवेन भारती, १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी, यांनी यापूर्वी मुंबईत विशेष पोलीस आयुक्त, सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था), आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अशा महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
