मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुध्द साबळे.

भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सशक्त भारत बनवण्याच्या वाटचालीचे एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे “गरीबांना घरे” पंतप्रधान आवास योजने मधुन गरजवंत, बेघर कुटुंबांना केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना सुरू करुन मोठा दिलासा दिला आहे त्याचाच एक भाग म्हणून २०१८ च्या सर्वेक्षण मधुन वगळलेली, वंचित राहिलेली गरजवंत कुटुंबाला हक्काचं पक्कं घर मिळावे म्हणून २०२५ पासून ‘पंतप्रधान आवास योजना टप्पा क्रमांक २’ सुरू करण्यात आला असून या मध्ये वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांनी https://play.google.com/store/apps/details?id=r.rural.awaasplus_2_0 या वेबसाईटवर जाऊन “आवास प्लस २०२४” हे ऍप्लिकेशन डाऊनलोड करून स्वताचा सर्वे दिनांक १५ मे पर्यंत करुन घ्यावा किंवा ज्यांना सेल्फ सर्वे करता येणार नाही अशांनी आपल्या गावातील ग्रामसेवाकडुन हा सर्वे करून घ्या या साठी अपडेट असलेले आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, जाॅब कार्ड इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत ज्यांना कुणाला या सर्वे साठी अडचण येत असेल अश्या लाभार्थ्यांनी “सतिश घाटगे पाटील यांच्या जनसेवा कार्यालयात संपर्क साधावा” असं आवाहन भारतीय जनता पक्षाचे घनसांगवी तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम उढाण यांनी केले आहे

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!