मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.

मुख्य कार्यकारी अधिकारी मणियार दोषींवर कारवाई करुन उपोषण कर्त्यास न्याय देणार का ?

परतूर तालुक्यातील मौजे आष्टी ग्रामपंचायत मध्ये झालेल्या लाखो रुपयाच्या भ्रष्टाचारा विरुद्ध जिल्हा परिषद जालना कार्यालयासमोर तब्बल ६ दिवसापासून भगवान रंगनाथ वाघमारे यांचे उपोषण सुरु उपोषणकर्ता भगवान रंगनाथ वाघमारे यांची प्रकृती अत्यंत खालावली असून ही जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे जाणून बुजून दुर्लक्ष तर करत नाहीत असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एकंदरीत मौजे आष्टी येथील ग्रामपंचायत चे ग्रामसेवक आणि सरपंच यांनी संगनमत करुन १५ व्या वित्त आयोग मधील निधीचा अफरातफर करुन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असून तसेच घरकुल योजने मध्ये काम न करता बिले उचलण्यात आली. एम. आर.जी. एस. ची कामे अर्धवट करुन संपूर्ण बिल उचले आणि घरकुल लाभार्थ्यांकडून पैसे घेऊन घर न बांधता संपूर्ण बिल उचलण्यात आले आहे. गावातील महात्मा ज्योतिबा फुले व्यापारी संकुलनाचे काम अर्धवट असतांना सुध्दा त्यामधून बिअर बार साठी रस्ता ठेवलेला आहे. तो रस्ता कोणत्या आधारावर देण्यात आला आहे. रोजगार हमी योजना मधील अहिल्यादेवी सिंचन विहीरीचे व पांदण रस्त्याच्या भ्रष्टाचारा बाबत वारंवार तक्रार करूनही अद्याप कसल्याही प्रकारची चौकशी होत नाही. ग्रामपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन दोषी ग्रामसेवक, सरपंच व या भ्रष्टाचारा मध्ये सहभागी असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्यावर जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी मणियार ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचाराची चौकशी करुन कारवाई करणार का? उपोषण कर्त्याला न्याय देणार का ? असा प्रश्न गावकऱ्यांना पडलेला आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!