मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.
गाव तिथे मराठा सेवक या मनोज दादा जरांगे पाटील यांच्या संकल्पनेप्रमाणे गेली कित्येक दिवस व काल दिनांक 01/0 5 /2025 रोजी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भोर वेल्हा. या सह्याद्रीच्या कुशीत असलेले आपले मराठा सेवक मनोज दादांचे मावळे यांच्याशी चर्चा करून सह्याद्रीच्या कडाकपारीवर लुकलुकणारी जांभळी. सांगवी बुद्रुक.वीरवाडी. बोरावडे. पारवडी. कुरुंवडी. अशा गावांना भेटी देऊन मराठा सेवकांची यादी बनवण्यात आली.

वरील भेटीगाठी दरम्यान आपल्या मराठा सेवकांनी आयोजित केलेली पंचकोशी प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा पाहण्याचा योग आला…
पंचकोशी प्रीमियर लीग!! स्थळ: कुरुंगावडी फाटा तालुका भोर जिल्हा पुणे या ठिकाणी आपले मनोज दादांचे गाव तिथे मराठा सेवक एक संकल्पना व्यक्त करण्यासाठी आयोजकांनी आपल्या सर्वांना आमंत्रित केले आहे, या ठिकाणी सर्व गावचे सरपंच व गावकरी उपस्थित असणार आहेत तरी सर्व मराठा सेवकांनी येण्याचे करावे ही नम्र विनंती. यासाठी आपल्याला आज दिनांक 02 /05 /2025 रोजी नवले ब्रिज या ठिकाणी सायंकाळी चार वाजता जमायचे आहे 🙏🙏एक मराठा लाख मराठा 🙏🙏
