*कोल्हापुर प्रतिनिधी, प्रदिप जाधव.

सालाबादप्रमाणे याही वर्षी वैशाख महिण्यात परंपरेने येणारी छत्रपति शिवाजी महाराज जयंतीची मिरवणूक शहर व उपनगर येथील मंडळांनी मोठ्या थाटात साजरी केली,पारंपारिक वाद्य,लाईट शो, साऊंड सिस्टीम, शाहू तरुण मंडळाचे कोल्हापूर जिल्ह्यातील समस्या दाखवणारे फलक, दहा फूट उंचीचा जिरेटोप मिरवणुकीचे आकर्षन होते, मावळ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, व महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते, सकल हिंदू समाजातर्फे मिरजकर तिकटी चौकात लहान मुले हिंदू समाजाला संदेश देणारे फलक घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते,संयुक्त गंजीमाळ तालीम , संयुक्त मंगळवार पेठ, संयुक्त खंडोबा तालीम, संयुक्त उत्तरेश्वर पेठ,घिसाड गल्ली, संयुक्त पाचगाव,मराठा वॉरियर्स यासह विविध मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. मिरवणुकीत बिनखांबी गणेश मंदिर चौकात मंडळांच्या मध्ये ट्रॅक्टर पुढे घेण्यासाठी वाद झाला काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद घालणारऱ्यांवर सौम्य लाठिचार्ज केला, त्यानंतर मिरवणूक पुढे ढकलण्यात आली, संपूर्ण मिरवणुक मार्ग गर्दीने फुलून गेला होता.

