मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.

घनसांवगी मतदारसंघातील मंगुजळगाव येथे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-२ चा शुभारंभ जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद जालना आणि पंचायत समिती, घनसांवगी यांच्या संयुक्त विद्यमाने झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार हिकमत दादा उढाण यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी पंचायत समितीचे बीडीओ, पदाधिकारी, कर्मचारी आणि सरपंच ,उपसरपंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत गावांना खुले शौचमुक्त (ODF) ठेवणे, ठोस आणि द्रव कचरा व्यवस्थापन, स्वच्छता सुविधांचा विकास आणि ग्रामीण भागात स्वच्छतेचा स्तर उंचावणे यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

आमदार हिकमत दादा उढाण यांनी याप्रसंगी बोलताना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आणि ग्रामस्थांना या मिशनमध्ये सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
