कारंजा तालुका प्रतिनिधी.

ठाणेदार, तहसीलदार, जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी मॅडम यांच्याकडे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शंकर नांदे व आरोग्य खात्यातील महिलांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे, परंतु तक्रारीला एक महिन्या उलटून सुद्धा अद्याप चौकशी सुद्धा करण्यात आली नाही. कारवाईची अपेक्षा करायची तरी कोणाकडे असा सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार विनोद नंदागवळी यांचा प्रश्न आहे व तसेच ज्या अधिकाराच्या विरोधात तक्रार दाखल केली, त्यांच्यावर कारवाई न करता उलट दोशी असणाऱ्या अधिकाऱ्याकडून पैसे खाऊन अधिकाऱ्याकडून तक्रारकर्त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेला एक प्रकारे दबावतंत्राचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न याठिकाणी होत आहे, असे मत काही जाणकारांनी देखील व्यक्त केलेले आहे, त्यामुळे संविधानाच्या चौकटीत राहून न्याय मिळवण्यासाठी नाईलाजाने आमरण उपोषण १४ मे २०२५ रोजी तहसील कार्यालय कारंजा येथे माझ्यावर आमरण उपोषण करण्याची वेळ आणून टाकली आहे, असे मत विनोद नंदागवळी यांनी आमच्या प्रतिनिधी यांना प्रतिक्रिया दिली.

विनोद नंदागवळी (सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार) यांच्या प्रमुख मागण्या…

१) तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शंकर नांदे आपल्या पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी दूरउपयोग केल्यामुळे यांना निलंबन करण्याबाबत.

२) ठाणेदार कारंजा पोलीस स्टेशन शहर यांनी तालुका आरोग्य अधिकारी नांदे यांनी संगमत करून आरोग्य अधिकारी नांदे यांच्यावर गुन्हा दाखल न करता उलट माझावर खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबन ची कारवाई करण्याबाबत.

३) कारंजा तालुका आरोग्य कार्यालयातील आशा सेविका यांना कारणे दाखवा नोटीस देऊन पदावरून काढून टाकण्याच्या धमक्या देणाऱ्या कारंजा तालुका आरोग्य अधिकारी शंकर नांदे याना निलंबन ची कारवाई करण्याबाबत.

४) कारंजा येथील एसी वाईन शॉप दुकान बंद करण्याबाबत.

५) एसी वाईन शॉप दुकान मालकासोबत सेटलमेंट करणाऱ्या चौकशी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याबाबत.

६) उत्पादन शुल्क अधिकारी वाशिम यांनी तक्रारीवर कोणत्याच प्रकारे कारवाई न केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!