मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.
तहसील कार्यालय घनसावंगी
महाराष्ट्र दिनानिमित्त आज तहसील कार्यालय, घनसावंगी येथे शासकीय ध्वजारोहण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या समारंभात माननीय आमदार श्री. हिकमत दादा उढाण यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाला तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक,पदाधिकारी आणि विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत सादर करण्यात आले आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी आमदार श्री. हिकमत दादा उढाण यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना राज्याच्या प्रगती आणि समृद्धीसाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

हा समारंभ महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करणारा ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केले, तर आभारप्रदर्शन तहसीलदार यांनी केले.
