नंदूरबार प्रतिनिधी
उन्हाळ्यात शहरातील मुलांना समर कॅम्प चे वेध लागतात,परंतु ग्रामीण भागातील मुलांना ही संधी मिळत नाही. हाच धागा पकडून जिल्हा परिषद शाळा पावला पश्चिम येथे गेल्या दोन वर्षांपासून समर कॅम्प चे आयोजन केले जाते. यावर्षी जिल्हा परिषद शाळा पावला पश्चिम आणि एस आर दळवी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार तालुका गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री निलेश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने दिनांक 14 एप्रिल ते 19 एप्रिल 2025 दरम्यान जिल्हा परिषद शाळा पावला पश्चिम येथे पर्यावरण पुरक समर कॅम्प घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी गावच्या सरपंच सौ भानुमती वळवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश वळवी, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

या समर कॅप मध्ये विद्यार्थ्यांनी सीड बॉल बनवणे,पळसाच्या आणि मोहाच्या पानापासून पत्रावळी व द्रोण तयार करणे, मातीची भांडी तयार करणे, स्टोन आर्ट, योगासन- प्राणायाम या ऍक्टिव्हिटी केल्या. प्लास्टिकचे दुष्परिणाम,औषधी वनस्पतींची माहिती यासारख्या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी प्रमिला ताई वळवी, उर्मिला ताई वळवी, राधिकाबाई वळवी, गुलीबाई वळवी आज्जी, अमिलाबाई वळवी यांनी सहकार्य केले. मुलांनी सदर कॅम्प मध्ये आनंदाने सहभाग घेतला. सर्व ऍक्टिव्हिटी मध्ये मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मुलांना समर कॅम्प खूप आवडला.

दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी समर कॅम्प चा शेवटचा दिवस.
समारोप प्रसंगी धानोरा बिटाचे शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय श्री जयंत चौरे साहेब, धानोरा केंद्राचे केंद्र प्रमुख श्री उदयकुमार बोरसे सर, मोठा कुंभारपाडा शाळेचे मुख्याध्यापक श्री किरण घरटे सर, पूर्व पावला शाळेचे उपशिक्षक श्री गणेश कोकणी सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तूंची पाहणी केली. त्यांचे कौतुक केले. NEP 2020 मध्ये असणारा मुद्दा, विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित करणे हे काम तुमच्याकडे आतापासून सुरू झाले आहे, अशी प्रतिक्रिया दिली. मुलांना पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगितले आणि या उपक्रमासाठी खूप शुभेच्छा दिल्या. उपक्रमा अंतर्गत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना *एस आर दळवी फाउंडेशन* यांच्यातर्फे प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देण्यात आली तसेच सर्व विद्यार्थ्यांना अल्पपहार देण्यात आला त्याबाबत एस. आर. दळवी फाउंडेशनचे खूप खूप आभार तसेच प्रभात सर व समृद्धी मॅडम यांचे खूप खूप आभार. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय वळवी व उपशिक्षक रागिणी वाडेकर यांनी मेहनत घेतली.
