मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.
शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदानाचा गैरव्यवहार संदर्भाने आज युवा शेतकरी संघर्ष समितीने भिक मागो आंदोलन करून जमा झालेली भिक मा.तहसीलदार यांच्या रिकाम्या खुर्चीला दिली… व संबंधित घोटाळ्यासाठी नेमलेल्या त्रीसदस्य समिती मार्फत तातडीने चौकशी करून दोषीवर बडतर्फीची कार्यवाही करावी असे निवेदन आज जिल्हाधिकारी मार्फत तहसीलदार यांना देण्यात आले.

मा. उपजिल्हाधिकारी श्रीमती खेत्रेवार यांच्याशी फोनवर झालेल्या चर्चे दरम्यान येत्या आठ दिवसात अद्यापही VK नंबर न मिळाल्याने अमुदानापासून वंचित असलेल्या खऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना सर्वांना विखे नंबर मिळून तात्काळ त्यांचे अनुदान देण्यात यावे नसता आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत असा ईशारा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला..
बाजारपेठेत भिक मागून आणलेले 180/-रुपये तहसीलदार यांच्या रिकाम्या खुर्चीला दिलेले नंतर नायब तहसीलदार श्री. तोतला साहेब यांच्याकडे सुपूर्द केले…
अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आजच्या प्रसंगी उपस्थित सर्व शेतकरी पुत्रांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐
युवा शेतकरी संघर्ष समिती, घनसावंगी तालुका…
