मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.
मतदारसंघातील आमदार हिकमत दादा उढान यांनी जिल्हा नियोजन व विकास समिती (डीपीडीसी) अंतर्गत 80 लाख रुपयांचा निधी आपल्या मतदारसंघातील शिवसैनिकांना वाटप केला आहे. गावागावांतील विकासकामांना चालना देणे आणि स्थानिक पातळीवर मूलभूत सुविधांचा विकास करणे हा या निधी वाटपामागील प्रमुख उद्देश आहे.

हिकमत दादा उढान यांनी सांगितले की, “हा निधी गावातील रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य सुविधा आणि इतर गरजांवर खर्च केला जाईल. शिवसैनिकांनी या निधीचा योग्य वापर करून गावाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे.” या निधीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील छोट्या-मोठ्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.
स्थानिक शिवसैनिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, हिकमत दादा यांच्या या पुढाकारामुळे गावातील विकासाला नवीन दिशा मिळेल, असे मत व्यक्त केले आहे. हा निधी पारदर्शकपणे आणि प्रभावीपणे वापरला जावा, यासाठी आमदार उढान स्वत: लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
