दिनांक 18/04/ 2025 शुक्रवार रोजी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग उत्तर महाराष्ट्र विभागनिहाय पदाधिकारी आढावा बैठक राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय खासदार श्री सुनील जी तटकरे साहेब यांच्या आदेशान्वये श्रीरामपुर येथे आयोजित करण्यात आलेली होती.

सदरील आढावा बैठकीस राष्ट्रवादी कांग्रेस सामाजिक न्याय विभाग चे प्रदेश अध्यक्ष माननीय प्राध्यापक श्री सुनीलजी मगरे साहेब तसेच प्रभारी श्रीरामपुरचे मा.आमदार श्री लहुजी कानडे साहेब, कार्यध्यक्ष मा.श्री. बाळासाहेबजी कर्डक साहेब तसेच राज्यातील प्रमुख सन्मानीय पदाधिकारी समस्त जिल्हाध्यक्ष तसेच कार्यकर्ते ह्या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आढावा बैठकीस राष्ट्रवादी कांग्रेस सामाजिक न्याय विभाग चे प्रदेश उपाध्यक्ष जितेंद्र अरुणभाई चांगरे यांचे तसेच उपस्थित पदाधिकारी यांचे सत्कार श्रीरामपुरचे मा. आमदार श्री लहुजी कनडे साहेब यांच्या हस्ते पुष्पागुच्छ तसेच भारताचे संविधान देवून करण्यात आले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!