कोल्हापूर प्रतिनिधी: प्रदीप जाधव
काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांची कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना राज्य सरकार वर आरोप केला की, महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्रावर सात लाख कोटी चे कर्ज, झाले महाराष्ट्रत जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या डोक्यावर कर्ज घेऊन जन्माला येत आहे, लाडक्या बहीण योजनेचे 2100 रु देण्याचे आश्वासन सरकारने पाळले नाही, उलट आता जे देत आहेत ते देखील मिळतील का नाही? यात शंका आहे, म्हणजे लाडक्या बहिणी आता सावत्र झाल्या आहेत का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री, अर्थमंत्री तिन्ही मंत्री वेगळे बोलत आहेत, निवडणूक आधी सुरात बोलनारे आता बेसुर का झाले? असे आमदार भाई जगताप यांनी प्रश्न उपस्थित केला, शक्तीपीठ महामार्गावर बोलताना म्हणाले कोणत्याही विकास कामांना आमचा विरोध नाही, परंतु तेथील जनभावना समजून घ्याव्यात, असे भाई जगताप म्हणाले.
