मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.

मतदारसंघातील सिद्धेश्वर पिंपळगाव येथे श्रीराम नवमी, हनुमान जयंती आणि आमली बारस यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीतमय रामकथा सोहळ्याचा समारोप आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या समारंभाला ब्लू सफायर फूड प्रोसेसिंग प्रा. लि. चे चेअरमन श्री.दिलीप जिजा उढान यांनी विशेष उपस्थिती दर्शवली.

प.पू. सदगुण एकनाथानंद रामानंद सरस्वती (भोले बाबा) यांची प्रमुख उपस्थिती हाेती . त्यांनी या धार्मिक कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संयोजकांचे कौतुक केले आणि अशा सोहळ्यांमुळे समाजात सकारात्मकता आणि भक्तिभाव वाढतो, असे मत व्यक्त केले.

सप्ताहभर चाललेल्या या कार्यक्रमात रामकथेचे सुमधुर सादरीकरण, भक्तिमय हरिनाम संकीर्तन आणि विविध धार्मिक विधी यांनी गावकऱ्यांसह परिसरातील भाविकांना मंत्रमुग्ध केले. समारोप सोहळ्यात मोठ्या संख्येने भक्तांनी सहभाग नोंदवला आणि भक्तिमय वातावरणात कार्यक्रम पार पडला.
