मराठवाडा विभागीय पदाधिकारी, अनिरुद्ध साबळे.
विधानसभा निवडणुक 2024 मध्ये राज्यातील शेतकरी, लाडक्या बहिणी, जनतेला महायुतीतील तिन्ही पक्षांनी *संकल्पनामा* मध्ये दिलेल्या आश्वासनांची फसवणूक केल्याबद्दल १४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता जालना जिल्ह्यातील गावागावातील प्रमुख चौकात महायुतीच्या संकल्पनाम्याची होळी करण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्रित संकल्पनामा प्रसिद्ध करून त्यात शेतकऱ्यांना पहिल्याच कॅबिनेट बैठकीत कर्जमाफी, सोयाबीनची 6 हजार रु नी खरेदी, सर्व शेती निविष्ठा वरील GST कर रद्द करणार, MSP अंतर्गत येणाऱ्या सर्व शेतीमालाला 20 टक्के बोनस देऊन खरेदी करणार, लाडक्या बहिणीना 2100 रु महिना देणार, सुशिक्षित बेरोजगारांना 10 हजार रु महिना देणार, ज्येष्ठ नागरिक, विधवांना महिना 2100 रु देणार अशी अनेक आश्वासन निवडणूक प्रचारावेळी प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यात येऊन मोदींची गॅरंटी म्हणून दिलं राज्यातील शेतकरी, लाडक्या बहिणी, तरुण, ज्येष्ठ नागरिक, व सामान्य जनतेने मोदींचे गॅरंटीवर विश्वास ठेऊन राज्यात महायुतीला प्रचंड बहुमताने सत्ता दिली पणं निवडून येताच राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी राज्याची आर्थिक परिस्थिती डबघाईची असल्याचे कारण देत महायुतीच्या संकल्पनाम्यातील वरील सर्व आश्वासने पूर्ण करण्यास नकार दिला आहे, वास्तविक गेल्या ११ वर्षपासून अर्थमंत्री असलेले अजित पवार व महायुतीच्या नेत्यांनी राज्याची आर्थिक स्थितीचे आंथरून पाय पसरण्यासारखे आहे, की नाही याची खात्री करूनच आश्वासने दिली पाहिजे होती, परंतु सत्ता ताब्यात घेण्यासाठी राज्याचे अर्थस्थितीचे आंथरून न पाहता पाय पसरले वरील आश्वासनांची मोदींनी गॅरंटी घेतली होती म्हणूनच *मोदी गॅरंटीला* भुलून राज्यातील शेतकरी, लाडक्या बहिणी, तरुण, ज्येष्ठ नागरिक विधवांनी व जनतेने महायुतीला सत्तेत बसविले पणं सत्तेचे १०० दिवस पूर्ण होण्याआधीच महायुतीने राज्य सरकार आर्थिक डबघाईत असल्याचे कारण आश्वासन पूर्ण करता येणार नाही असे स्पष्ट जाहीर केले.
त्याचा निषेध म्हणून व महायुतीच्या शिर्षस्थ नेत्यांना आठवण करून देणेसाठी *स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना, शेतकरी संघटना महिला आघाडी* १४ एप्रिल सकाळी ११ वां. राज्यभरात *महायुतीच्या संकल्पनाम्याची जाहीर होळी आंदोलन* करणार आहेत, तरी वरील आंदोलनाची शासनाने तत्काळ दखल घेऊन राज्यातील शेतकरी, लाडक्या बहिणी, सुशिक्षित तरुण व सामान्य जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी अन्यथा पुढील काळात उग्र आंदोलन करून महायुतीचे आमदार, खासदार, नेते, यांना गावागावांतील शेतकरी याचा जाब विचारण्याची हिंमत करणार आहोत.
सदर निवेदन विश्वंभर भानुसे तालुकाप्रमुख शेतकरी संघटना घनसांगवी, दिनकर आबा तौर उपतालुका प्रमुख शेतकरी संघटना घनसावंगी, विष्णु शिंदे स्वतंत्र भारत पक्ष तालुका प्रमुख घनसावंगी, अशोक हेमके स्वतंत्र भारत पक्ष आंदोलन प्रमुख घनसावंगी, दीपक आनंदे युवा आघाडी शेतकरी संघटना तालुकाप्रमुख घनसावंगी, सतीश कदम युवा आघाडी उप तालुकाप्रमुख घनसावंगी, दीपक भुतेकर संपर्कप्रमुख शेतकरी संघटना घनसावंगी, तात्यासाहेब भानुसे ज्येष्ठ कार्यकर्ते शेतकरी संघटना, नामदेवराव काळे जेष्ठ कार्यकर्ते शेतकरी संघटना, राजेंद्र अटकळ, दत्ता वाघमारे, विलास कोकाटे, विलास बोराडे, कृष्णा उढाण, माऊली सावंत, प्रताप मोरे, पुंजाराम जाधव, दिलीप बाप्पा तौर, ज्ञानेश्वर नाईकवाडे, बापूराव घुमरे, शिवाजी हरबक, कैलास हरबक, कृष्णा कोळे,
महादेव माळोदे, अविनाश चांदर, दादासाहेब मुठाळ, शिवाजी राठोड, हनुमान दहिभाते, सुशील पटेकर यांच्या उपस्थितीत असे होते.
निवेदन
घनसावंगी तहसीलदार सौ.योगिता खटावकर यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, श्री.अजित पवार यांना पाठविण्यात आले. ज्या शेतकरी मित्रांना, लाडक्या बहिणींना, सुशिक्षित बेरोजगार युवकांना त्यांची स्वतः ची फसवणूक केली असल्याचे जाणवले आहे, त्या सगळ्यांनी या *महायुतीच्या जाहीरनामा होळीचे आंदोलन* मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे तालुकाप्रमुख विश्वंभर भानुसे यांनी केले.
