घनसांगवी प्रतिनिधी, भाऊसाहेब राऊत.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोंसी खुर्द येथे ‘चावडी वाचन’ कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांची वाचन, लेखन, संख्याज्ञान व संख्यावरील क्रिया या चारही मूलभूत अध्ययन क्षमतांमधील प्रगती सादर करण्यात आली.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध स्तरांवर केलेली शैक्षणिक प्रगती प्रात्यक्षिकाद्वारे ग्रामस्थ, पालक व शालेय व्यवस्थापन समितीसमोर मांडली. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने वाचन, लेखन, आकडेमोड, बेरीज व वजाबाकीचे सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

मुख्याध्यापक श्री. विलास मुळक यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती संध्या वाळके, श्रीमती उर्मिला झांजे व श्री. हनुमान पालकर या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सराव देऊन तयार केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या वाचन व गणितीय कौशल्यात झालेली स्पष्ट प्रगती दाखवली.

गावातील पालक व ग्रामस्थांनी शाळेच्या उपक्रमशीलतेचे व विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी भावना व्यक्त केली.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!