मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.

घनसावंगी मतदारसंघातील शेतकरी श्री. गजानन उगले यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी, विशेषतः शेतकरी अनुदान आणि दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण आज नवव्या दिवशी स्थगित करण्यात आले. आमदार हिकमत दादा उढाण यांनी मध्यस्थी करत उपोषणस्थळी भेट दिली आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून उगले यांच्या मागण्या पूर्ण होण्याचे आश्वासन दिले.

श्री.गजानन उगले हे गेल्या नऊ दिवसांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बेमुदत आमरण उपोषणाला बसले होते. त्यांच्या मागण्यांमध्ये पीकविमा, फळबाग विमा, अतिवृष्टी अनुदान, दुष्काळी अनुदान आणि अवकाळी पावसाचे अनुदान यांचा समावेश होता.

आमदार हिकमत दादा उढाण यांनी या प्रकरणात पुढाकार घेत हस्तक्षेप केला. त्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन गजानन उगले यांच्याशी चर्चा केली आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून मागण्या मान्य करण्याबाबत ठोस आश्वासन दिले. या आश्वासनानंतर उगले यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.

“शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे ही आमची प्राथमिकता आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच मागण्यांवर कार्यवाही होईल,” असे आमदार उढाण यांनी सांगितले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!