घनसांगवी प्रतिनिधी, श्रीराम गोफणे.

मौजे घोंसी खुर्द ता. घनसांगवी गावामधे झालेला भ्रष्टाचार प्रकरणात कुठल्याच प्रकारची काम न करता बिले उचलेली आहेत, या गोष्टी संपुर्ण ग्रामस्थ प्रचंड नाराज असून प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार करत आहेत, मात्र प्रशासन दोषींवर कारवाही करण्या ऐवजी फक्त वेळ काढू पना करत असून, आता या विषयी काही कार्यवाही न झाल्यास ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्याची तय्यारी केलेली आहे, असे आमच्या प्रतिनिधी यांना ग्रामस्थांनी सांगितले.

मौजे धोंसी खुर्द गावा खुप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, या मध्ये गावाला कसल्याही प्रकारे पिण्यासाठी पाणी नाही, तसेच स्मशानभुमी, तीन विहिरी, तीन सार्वजनीक स्वच्छालय, सहा पिव्हर ब्लॉक सिमेट रस्ते, पाच गाव अतर्गत नाली, गाव अंतर्गत तक पाईपलाईन कसल्याही प्रकार केलेली नाही, सदरची कामे फक्त कागदावरच असून संपूर्ण पैसे उचलन्यात आलेले आहे.

या प्रकरणामध्ये प्रशासनाने दिनांक २५/०२/२०२५ रोजी समिती नेमली, तर समितीने गावतील काम पाहाणी केली प्रत्यक्षदर्शी समितीला एकही काम दिसून आले नाही, समितीने चौकशी अंती अहवाल तयार केला परंतू सदर अहवालानुसार दोषी कर्मचान्यावर कसली प्रकारे कारवाही होत नाही.

माहिती अधिकारांतर्गत दिनांक 11/01/2025 रोजी माहिती मागवली असता सदर चा सर्व भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!