कोल्हापूर प्रतिनिधी प्रदीप जाधव.

क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून हटवावी, असे शिवबाचा मावळा संघटनेतर्फे निवेदन सादर करण्यात आले, या निवेदनात असे म्हटले आहे की, नम्रपणे आपल्याकडे अशी आग्रही मागणी करतो की, स्वराज्य शत्रू असलेल्या क्रूरकर्मा औरंगजेबाची खुलताबाद, छत्रपती संभाजी नगर जिल्हा येथे असलेली कबर शासनाने त्वरित हटवावी.


शिवरायांचा पवित्र भूमीतून ही कबर त्वरित हटवावी ही आमची मागणी आहे, अन्यथा यासाठी सदनशिर मार्गाने आंदोलन करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून हटवून ज्याप्रमाणे अमेरिकेने लादेनला खोल समुद्रात अज्ञात ठिकाणी गाडले, त्याप्रमाणे औरंगजेबाला महाराष्ट्रातून कबरीतून हटवून अज्ञात ठिकाणी गाडावे, या मागणीचे निवेदन शिवबाचा मावळा संघटनेतर्फे महाराष्ट्र शासनास देण्यात आले. हे निवेदन शासनाच्या वतीने नायब तहसीलदार नम्रता शिराने यांनी स्वीकारले. यावेळी ऍडव्होकेट अमोल माने, जयदीप सरवदे, विनोद पाटील, धनंजय पन्हाळकर, शंकर कांबळे, विश्वविजय सरवदे तसेच शिवबाचा मावळा संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!