पंढरपूर प्रतिनिधी.

पंढरपूर : स्वाभिमानी मराठा हा संघ युवा आघाडी प्रदेश कार्याध्यक्षपदी लखन वसंत घाडगे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ. कृषिराज टकले पाटील नियुक्ती पत्र दिले. लखन घाडगे पाटील निवडी प्रसंगी म्हणाले की, मराठा समाजातील तरुण इतिहास काळापासून लढाऊ आहेत. यामुळे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी तरुणांनी पुढे यावे, सर्व समाजाला एकत्र करण्यासाठी प्रयत्न करत शेतकरी प्रश्न हातात घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी संघटना कार्य करेल.

लखन घाडगे पाटील यांच्या नियुक्तीबद्दल स्वागत राष्ट्रीय अध्यक्ष मराठा रामनारायण, राष्ट्रीय उपाध्यक्ष निलेश धुमाळ पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस राजबीर सिंह, राष्ट्रीय चिटणीस सलील सुर्यवंशी, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा कोकीळा पवार, प्रदेशाध्यक्ष गौरव पवार, कार्याध्यक्ष दिपक पवार, शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुभाष गागरे, युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अभिजित खैरे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अनिता पाटील, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष मायाताई देशमुख, प्रदेश कार्याध्यक्षा अमृता पठारे, युवा आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रुपेश दळवी, पुणे जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष देवदत्त पोखरकर, पुणे जिल्हा अलका सोनवणे, पुणे शहर अध्यक्ष सविता खोजे, हवेली तालुका अध्यक्ष शिवशंभू प्रिया जांभळे आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!