जळगाव प्रतिनिधी, महेश माळी.

जळगांव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला. ना. सा. विद्यालयात महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले. शाळेच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात सखी सावित्री : महिला तक्रार निवारण समिती चे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.

सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती आणि माता पालक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मनोमंथन’ या प्रबोधनात्मक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक तथा सुप्रसिद्ध समुपदेशक सौ. श्वेता जैन, शिक्षण प्रसारक मंडळाच्या समन्वयिका श्रीमती रजनी पाठक, सौ. लता छापेकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे, पर्यवेक्षिका सौ. रमा तारे आणि पर्यवेक्षक श्री. जगदीश साळुंखे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी सौ. श्वेता जैन यांचे श्रीमती रजनी पाठक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून करण्यात आली.

विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन

यावेळी समुपदेशक सौ. श्वेता जैन यांनी एलसीडी प्रोजेक्टर आणि स्लाईडच्या माध्यमातून उपस्थित विद्यार्थिनी आणि त्यांच्या माता-पालकांना मार्गदर्शन केले. त्यांनी शिस्त, मनोबल, ध्यानधारणा म्हणजे काय, ती कशी करावी आणि तिचे फायदे काय आहेत, याबाबत सखोल माहिती दिली. तसेच विद्यार्थिनी आणि महिलांच्या समस्या व त्यावरील निराकरण याबाबत मार्गदर्शन करत मेडिटेशनचे सामूहिक प्रात्यक्षिकही करून घेतले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती रजनी पाठक यांनी विद्यार्थिनींना उत्तम चरित्र आणि सुयोग्य वर्तन याबाबत बहुमोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संयोजन

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला तक्रार निवारण समिती प्रमुख सौ. प्राजक्ता गोहिल यांनी केले, तर प्रमुख अतिथींचा परिचय सौ. रोहिणी प्रचंड यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रेवती किन्हीकर यांनी तर आभार प्रदर्शन सौ. मधुश्री मदाने यांनी केले.

यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी आणि माता पालक उपस्थित होत्या. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनींनी विशेष परिश्रम घेतले.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!