जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार

विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थी, समाजभूषण आणि कष्टकरी कामगार बांधवांच्या सन्मानासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ, समाजभूषण पुरस्कार वितरण व कामगार मेळावा रविवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी ४:०० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमासाठी समाजातील सर्व विद्यार्थी, समाज बांधव व भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान होणार

समाजातील ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे, अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या सोहळ्यात करण्यात येणार आहे. पालकांनी आपल्या पाल्याची गुणपत्रिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘समाजभूषण पुरस्काराने’ गौरविण्यात येणार असून, त्याचबरोबर समाजातील कामगार बांधवांसाठी विशेष मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे.

आपले सहकार्य हीच आमची प्रेरणा – विश्वकर्मा वंशीय समाज संघटन

संपर्क व गुणपत्रिका पाठवण्यासाठी संपर्क क्रमांक:

• ९५०३२९५०३४ • ८२०८४६३४९४ • ९९६०३५२८९६ • ९५१८५६६६२० • ९२८४८३३८५२ • ७७९८८५९९९१ • ९६५७९२२१६७ • ७७५८०७७९९७

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!