दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

मुंबई – महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने दिवाळीपूर्वी मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मोठी घोषणा केली आहे.

राज्यातील दुष्काळग्रस्त यादीत आणखी ४० तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून, आता एकूण दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या ३०५ झाली आहे. यापूर्वी ही संख्या २६५ होती. म्हणजेच राज्यातील एकूण ३५८ पैकी ८५ टक्क्यांहून अधिक तालुके आता दुष्काळाच्या छायेत आले आहेत.

दिवाळीपूर्वी थेट खात्यात ५ हजार

दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिवाळी सणापूर्वी ५,००० रुपयांची अग्रीम मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळाशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

ही अग्रीम मदत सुमारे ६००० कोटी रुपयांची असणार असल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी याचा मोठा आधार मिळणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले की, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जाणार असून पाण्याच्या टँकरचे जीपीएसद्वारे ट्रॅकिंग केले जाणार आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!