धुळे जिल्हा प्रतिनिधी.

धुळे जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी यांनी 5 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मंगळवारी काढण्यात आलेल्या आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ नवीन ठिकाणी हजर होऊन कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अशा झाल्या बदल्या :

• धुळे तालुक्याचे निरीक्षक धनंजय पाटील यांची नंदुरबार जिल्ह्यात बदली झाल्याने रिक्त झालेल्या पदावर धुळे शहरचे निरीक्षक हेमंतकुमार साहेबराव भामरे यांच्याकडे धुळे तालुक्याचा प्रभारी पदभार सोपवण्यात आला आहे.

• धुळे शहर निरीक्षकपदी नियंत्रण कक्षातील अर्चना सुपडू पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

• जिल्हा विशेष शाखेचे राजू संपत सुर्वे यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

• नियंत्रण कक्षातील सहाय्यक निरीक्षक निलेश रमेशसिंग मोरे यांच्याकडे नरडाणा पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

• नरडाण्याचे सहाय्यक निरीक्षक सचिन कापडणीस यांची धुळे आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.

या प्रशासकीय फेरबदलामुळे जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सर्व अधिकाऱ्यांनी नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तत्काळ रुजू होऊन अनुपालन अहवाल सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!