जळगाव/मुंबई – पावसाळा संपला, गारवा येईल असे वाटत असतानाच महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढला आहे. परतीच्या मान्सूनने दक्षिण भारतात प्रवेश केल्याने राज्यात कोरडे वातावरण निर्माण झाले असून, ऑक्टोबर हीटने नागरिकांना घामाच्या धारा फोडल्या आहेत.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, सोमवारी (12 ऑक्टोबर) मालेगाव येथे राज्यातील सर्वाधिक 38.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, जी या दशकातील ऑक्टोबरमधील उच्चांकी नोंद आहे.

राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान – सोमवारची नोंद

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यभर पारा 35 अंशाच्या पुढे गेला आहे:

• उत्तर महाराष्ट्र: मालेगाव 38.4°C, जळगाव 37.1°C, नाशिक 35°C

• कोकण / मुंबई: सांताक्रूझ 38°C, रत्नागिरी 38.3°C, मुंबई 36.5°C, डहाणू 36.3°C

• पश्चिम महाराष्ट्र / पुणे: पुणे 35.2°C, कोल्हापूर 34.1°C, सातारा 35.7°C, सोलापूर 37.6°C

• मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर 36.5°C, परभणी 35.9°C, नांदेड 36.1°C

• विदर्भ: अकोला 38.1°C, अमरावती 38°C, नागपूर 35.8°C, यवतमाळ 37.6°C पुढील 3 दिवस कसे असणार?

हवामान विभागाने आज 13 ऑक्टोबर रोजी कोकण विभागात उष्ण आणि दमट हवामान राहील असा इशारा दिला आहे, तर उर्वरित महाराष्ट्रासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय असल्याने पाऊस तिकडे वळला आहे, त्यामुळे महाराष्ट्रात पुढील 2 ते 3 दिवस हीच स्थिती कायम राहणार आहे.

नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हात जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!