चोपडा, जळगाव : मौजे सनपुले येथील गट क्रमांक 31 (1) मधील शासकीय जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी भिल्ल बांधवांच्या निवासी हक्कासाठी भीम आर्मी भारत एकता मिशनने निर्णायक लढा पुकारला आहे. या मागणीसाठी सोमवार, दि. 12 ऑक्टोबर 2026 रोजी पंचायत समिती कार्यालय, चोपडा येथे साखळी उपोषण करण्यात येणार आहे.

शासनाच्या लागू नियम, कायदे आणि धोरणांनुसार निवासी अतिक्रमणाची चौकशी करून पात्र कुटुंबांचे नावेकरण / नियमीतीकरण करावे, तसेच ज्यांच्याकडे स्वतःची निवासी जागा नाही अशा पात्र व गरजू कुटुंबांना नियमानुसार निवासी जागा उपलब्ध करून द्यावी, ही या आंदोलनाची मुख्य मागणी आहे.

भीम आर्मीच्या प्रमुख मागण्या:

१. निवासी अतिक्रमणाची चौकशी व प्रत्यक्ष पाहणी करावी. २. पात्र कुटुंबाचे नियमानुसार नावेकरण / नियमीतीकरण करावे. ३. भूमीहीन व गरजू कुटुंबांना निवासी जागा उपलब्ध करून द्यावी. ४. पात्र कुटुंबांना घरकुलाच्या लाभ मिळवून द्यावा. ५. पाणी, वीज, रस्ता, स्वच्छता यांसह मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. ६. प्रशासनाने निश्चित कालमर्यादेत लेखी कार्यवाही करावी.

या साखळी उपोषणास भीम आर्मी भारत एकता मिशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष आयु. गणेशभाऊ सपकाळे यांचे मार्गदर्शन लाभणार असून, प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आयु. राहुल जयकर आणि चोपडा तालुका अध्यक्ष मुबारकभाऊ तडवी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी समस्त आदिवासी भिल्ल बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, अनमोल सहकार्य भीम आर्मी जळगाव जिल्हा युनिटचे असणार आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!